Y-Prime, LLC
गोपनीयता धोरण
उद्दिष्ट
वैयक्तिक माहितीचे संकलन आणि तिचा वापर ह्यांच्याशी संबंध येतो तेव्हा Y-Prime, LLC (YPrime) ही पारदर्शकतेला प्रतिबद्ध आहे. हे निवेदन, वैयक्तिक माहिती संबंधित व्यक्तिगत हक्क व बंधने, माहिती संरक्षण या विषयीची YPrime ची प्रतिबद्धता स्पष्ट करते.
क्लायंट्सची सर्व वैयक्तिक माहिती, चिकित्सालयीन चाचणीतले सहभागी, विक्रेते, नोकरीसाठीचे अर्जदार, कर्मचारी, कंत्राटदार, भूतपूर्व कर्मचारी आणि YPrime ने पुरवलेल्या किंवा संकलन केलेल्या व YPrime कडून प्रक्रिया केली जाते अशा संकेतस्थळाला भेट देणारे (कुकीज आणि इंटरनेट टँग्ज सारखे) अशा सर्वांना ही सूचना लागू आहे.
तुमचे कँलिफोर्निया गोपनीयता हक्क (Your California Privacy Rights)
कँलिफोर्नियातील प्रचलित “Shine the Light” कायद्यानुसार, कँलिफोर्नियाचे रहिवासी जे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा घरगुती वापरासाठी आमच्या सेवा किंवा उत्पादनांचा लाभ घेण्यासंबंधात आम्हाला त्यांची ओळख पटवून दिली जाऊ शकेल अशी विशिष्ट वैयक्तिक माहिती पुरवतात; त्यांना आम्ही जर काही ग्राहक माहिती त्यांच्या स्वतःच्या थेट विपणन उपयोगांसाठी इतर व्यवसायांशी सामाईक केलेली असेल (काही असल्यास) तर ती मिळवण्याचा (एका कँलेंडर वर्षातून एकदा) अधिकार असतो. जर लागू होत असेल, तर ह्या माहितीत ग्राहक माहितीच्या श्रेणी, आणि ज्यांच्याशी गेल्या दिनदर्शिका वर्षी (उदा.जर 2021 साली विनंती केली तर 2020 सालची सामाईक केलेली माहिती, काही असल्यास, मिळेल) आम्ही ग्राहक माहिती सामाईक केली त्या व्यवसायांची नावे आणि पत्ते समाविष्ट असतील.
ही माहिती मिळवण्यासाठी, कृपया “Request for California Privacy Information” असे विषय ओळीमध्ये आणि मुख्य मजकुरात लिहिलेली एक ई-मेल privacy@yprime.com ला पाठवावी. विनंती केलेली माहिती तुमच्या ई-मेल पत्त्यावर उत्तर म्हणून आम्ही पाठवू.
कृपया हे लक्षात घ्या की, “Shine the Light” खाली सर्वच आवश्यक सामाईकीकृत माहिती येतेच असे नाही, आणि फक्त त्या खाली येणारी सामाईकीकृत माहिती आमच्या उत्तरात समाविष्ट असेल.
YPrime वैयक्तिक गोपनीयतेचा मान राखते आणि आपल्या ग्राहकांचा, कर्मचा-यांचा, चिकित्सालयीन चाचणी सहभागींचा, ग्राहकांचा, व्यावसायिक भागीदारांचा व इतरांच्या आत्मविश्वासाचे मूल्य जाणते. YPrime जेथे ते व्यवसाय करतात त्या देशातले प्रचलित कायदे सांभाळून वैयक्तिक माहिती गोळा करून, वापरून जाहीर करण्यासाठी परिश्रम करतात, पण आपल्या व्यवसायाच्या सर्वोच्च नैतिक परंपरांशी इमान राखण्याची त्यांची परंपरासुद्धा आहे.
पुढिल माहितीसाठीचे प्रश्न किंवा विनंत्या या थेट privacy@yprime.com कडे पाठवावे. YPrime ने GDPR पूर्ण केलेले आहे.
कधी सूचना अद्ययावत केलेली असू शकते. जेव्हा मजकूर अद्ययावत केला जाईल, तेव्हा शेवटच्या आवृत्तीची तारीख पानाच्या तळाशी दाखवली जाईल,
व्याख्या (Definitions)
“Data Controller” (माहिती नियामक) ही सामान्य किंवा कायदा जाणती सार्वजनिक अधिकारी व्यक्ती, एजन्सी, किंवा इतर संस्था एकटी किंवा इतरांसह वैयक्तिक माहिती प्रक्रियेचे उद्देश आणि मार्ग ठरवणारी असते.
“Data Subject” हा एक ओळखली जाण्यासाऱखी किंवा ओळखता येणारी सामान्य सजीव व्यक्ती असते.
“GDPR” म्हणजे युरोपियन युनियनचे सर्वसाधारण माहिती संरक्षण नियमन आहे
“Personal Data” म्हणजे अशी कोणतीही माहिती जी एखाद्या एका सजीव व्यक्तीशी संबंधित असते जिला त्या माहितीपासून ओळखले जाऊ शकेल. GDPR मध्ये ह्यालाच \”वैयक्तिक ओळख पटवून देणारी माहिती\” म्हणून ओळखतात.
“Processing” म्हणजे माहितीचा केलेला कोणताही उपयोग, ह्यात संकलन, साठवण, सुधारणा, प्रकटन व नष्ट करणे याचाही समावेश होतो.
“Data Processor” ही व्यक्ती सामान्य किंवा कायदे जाणती, सार्वजनिक अधिकारी, एजन्सी किंवा जी माहिती नियामकाचे वतीने वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करू शकते अशी इतर संस्था.
“Special Categories of Personal Data” (वैय़क्तिक माहितीच्या विशेष श्रेणी) म्हणजे व्यक्तीचे वांशिक किंवा मानववंशविषयक मूळ, गुन्हेगारी नोंदीची माहिती, राजकारणातील मते, धार्मिक किंवा आध्यात्मिक श्रद्धा, व्यापारी संघाचे सभासदत्व, आरोग्य, लैंगिक जीवन किंवा लैंगिक कल आणि बायोमेट्रिक माहिती आणि हा वैयक्तिक माहितीचा एक प्रकार आहे.
“Criminal Records Data” (गुन्हेगारी नोंदींची माहिती) म्हणजे एखाद्या व्यक्तीची गुन्हेगार म्हणून नोंद आणि अपराध, अपराधाचे आरोप आणि प्रक्रिया संबंधित सर्व माहिती.
माहिती संरक्षण तत्त्वे (Data Protection Principles)
YPrime पुढील माहिती संरक्षण तत्त्वांच्या आधारेच वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करतेः
- वैयक्तिक माहितीवर रास्त, वैध आणि पारदर्शक पद्धतीनेच प्रक्रिया केली जाते.
- वैयक्तिक माहिती फक्त विशिष्ट उद्देशांनी, उघडपणे आणि कायदेशीर उद्दिष्टांसाठी संकलन केली जाते.
- वैयक्तिक माहिती फक्त त्या उद्देशाला पुरेशी, संबद्ध आणि उद्देशित प्रक्रियांना आवश्यक असेल तितकीच प्रक्रिया केली जाते.
- नेमकी बिनचूक वैयक्तिक माहिती घेऊन त्यावर वाजवी पावले उचलून चुकीच्या वैयक्तिक माहितीच्या बिनचूक दुरुस्तीची खात्री केली जाते किंवा बिनाबिलंब काढून टाकली जाते.
- प्रक्रियेला आवश्यक तेवढाच काळ वैयक्तिक माहिती सांभाळली जाते.
- वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्यासाठी, अऩधिकृत किंवा बेकायदा प्रक्रिया, अपघाती नष्ट होणे, विनाश किंवा नुकसान होणे याच्या हमी साठी योग्य त्या उपाय योजना केल्या जातात.
YPrime वैयक्तिक माहितीची प्राप्ती, प्रक्रिया आणि विनियोग कसा करते यांच्या संदर्भात वरील तत्त्वपालनपूर्तीची हमी घेण्याची जबाबदारी घेते.
- वैयक्तिक माहितीवर रास्त, वैध आणि पारदर्शक पद्धतीनेच प्रक्रिया केली जाते.
- वैयक्तिक माहिती फक्त विशिष्ट उद्देशांनी, उघडपणे आणि कायदेशीर उद्दिष्टांनी संकलन केली जाते.
- वैयक्तिक माहिती फक्त त्या उद्देशाला पुरेशी, संबद्ध आणि आवश्यक असेल तितकीच प्रक्रिया केली जाते.
- नेमकी बिनचूक वैयक्तिक माहिती घेऊन त्यावर वाजवी पावले उचलून चुकीच्या वैयक्तिक माहितीच्या बिनचूक दुरुस्तीची खात्री केली जाते किंवा बिनाबिलंब काढून टाकली जाते.
- प्रक्रियेला आवश्यक तेवढाच काळ वैयक्तिक माहिती सांभाळली जाते.
- वैयक्तिक माहिती सुरक्षित करण्यासाठी, अऩधिकृत किंवा बेकायदा प्रक्रिया, अपघाती नष्ट होणे, विनाश किंवा नुकसान होणे याच्या हमी साठी योग्य त्या उपाय योजना केल्या जातात.
- वैयक्तिक माहिती कशी मिळवते, प्रक्रिया करते व तिचा विनियोग लावते याची आणि वरील तत्त्वांनुसार त्यांच्या पूर्ततेची हमी घेणे ह्याची जबाबदारी घेतात.
माहिती नियामकाविषयी विचार करता, YPrime व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेची कारणे, अशी माहिती कशी वापरली जाते, आणि तिच्या गुपप्ता सूचनांमध्ये कायद्याच्या आधारे कशी प्रक्रिया केली जाते, व्यक्तिंच्या खाजगी माहितीवर कशी इतर कारणांसाठी प्रक्रिया केली जात नाही हे सांगते. YPrime माहितीवर प्रक्रिया करायला जिथे तिच्या कायदेशीर स्वारस्यांवर अवलंबून आहे तिथे ती स्वारस्ये व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर व हक्कांवर गदा आणत नाहीत याची खात्री देण्यासाठी मूल्यांकन करतील. एखाद्या व्यक्तीने जर तसे कळवले की त्याची/तिची माहिती बदलली आहे किंवा अचूक नाही, तर YPrime ती तत्परतेने बदलून देईल.
जेव्हा डेटा प्रोसेसर किंवा सब –प्रोसेसरची बाब असते, तेव्हा YPrime फक्त वैयक्तिक माहितीला लागू होणारे कायदे, नियम, नियमने आणि डेटा कंट्रोलर/नियामकाने खास करून जसे सांगितले नेमके तसेच करेल.
कर्मचारी आणि कंत्राटदार नातेसंबंधात गोळा केलेल्या वैयक्तिक माहितीची हार्ड प्रत किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्या व्यक्तिच्या कर्मचारी फाईलमध्ये आणि YPrime च्या एचआर प्रणालींमध्ये ठेवली जाते. ही एचआर संबंधित वैयक्तिक माहिती YPrime किती काळपर्यंत ठेवते ते व्यक्तींना दिलेल्या गोपनीयता सूचनांमध्ये दिलेले आहे.
YPrime ला उत्पादने किंवाव सेवा पुरवणा-या संचालन व देखभाल कंत्राटदारांना कधी कधी YPrime ला पुरवठा करतांना व्यक्तींच्या वैयक्तिक माहिती पर्यंत मर्यादित प्रवेश असतो. YPrime ला सेवा द्यायला जेवढा म्हणून प्रवेश आवश्यक आहे तेवढाच मर्यादित प्रवेश कंत्राटदारांना वैयक्तिक माहिती पर्यंत दिला जातो. YPrime लात्यांच्या संचालन व देखभाल कंत्राटदारांनी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे 1) कोणत्याही वैयक्तिक माहितीची गोपनीयता या सूचनेनुसार पाळावी आणि 2) कोणाचीही वैयक्तिक माहिती YPrime ला नियमानुसार आवश्यक ती उत्पादने व सेवा पुरवण्याव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी वापरू किंवा उघड करू नये.
GDPR.च्या आवश्यकतांनुसार YPrime तिच्या वैयक्तिक माहिती प्रक्रिया उपक्रमांची माहिती नोंदवून ठेवते.
वैयक्तिक हक्क (Individual Rights)
एक माहिती प्रयुक्त म्हणून व्यक्तीला आपल्या वैयक्तिक माहिती विषयक अनेक अधिकार आहेत.
प्रयुक्त प्रवेश विनंत्या (Subject Access Requests)
व्यक्तिला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की YPrime ने त्यांच्या विषयी गोळा केलेली कोणती माहिती नियंत्रणात आहे आणि त्यांच्याकडून प्रक्रिया केली जात आहे आणि अशी वैयक्तिक माहिती अचूक असून ती ज्या उद्देशांनी गोळा केली गेली त्या संबंधित आहे अशी खात्री करून घेणे. एखाद्याने जर तशी रास्त विनंती केली तर YPrime तिला / त्याला सांगेलः –
- तिच्या /त्याच्या माहितीवर प्रक्रिया केली आहे का आणि असल्यास ते का, वैयक्तिक माहिती संबंधातील श्रेण्या आणि जर ती व्यक्तिकडून मिळवलेली नसली तर त्याचा स्रोत कोणता,
- कोणापाशी तिची/ त्याची माहिती उघड केली असू शकेल, वा केली जाऊ शकेल, युरोपियन आर्थिक क्षेत्रा (EEA) बाहेरचा स्वीकारकर्ता असेल तर अशा हस्तांतरणासाठी कोणते संरक्षणनियम लागू होतात;
- तिची /त्याची व्यक्तिगत माहिती किती काळपर्यंत साठवली आहे (किंवा तो कालखंड कसा ठरवला जाईल);
- माहिती काढून टाकणे, दुरुस्त करणे, किंवा प्रक्रियेला हरकत घेणे, किंवा त्या वर नियंत्रण आणणे हे तिचे/त्याचे अधिकार;
- जर तिला/ त्याला वाटले की YPrime तिचे/ त्याचे माहिती संरक्षण अधिकारांचे पालन करण्यात अपय़शी झाली आहे तर संबंधित माहिती गोपनीयता पर्यवेक्षक अधिका-याकडे तशी तक्रार करण्याचा तिला/ त्याला अधिकार आहे आणि
- YPrime स्वयंचलित (यंत्राधारीत) निर्णय घेते की नाही आणि अशा कोणत्याही निर्णयात गुंतलेले तर्क कोणते आहेत.
YPrime व्यक्तिला प्रक्रियेदरम्यान गोळा केलेल्या वैयक्तिक माहितीची प्रतसुद्धा पुरवेल. जर व्यक्तिने इलेक्ट्रॉनिक फॉर्मने विनंती केली असेल तर साधारणतः हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मने दिले जाईल, नसेल तर इतर प्रकारे.
व्यक्तिला जर अधिक प्रती पाहिजे असतील, तर YPrime त्यासाठी रास्त शुल्क आकारील, जे अधिक प्रती देण्यासाठी लागणा-या प्रशासकीय खर्चावर अवलंबून असेल.
प्रयुक्ताने प्रवेश विनंती करण्यासाठी, सदर व्यक्तिने marketing@yprime.com वर एक ई मेल पाठवावी. बहुतांश प्रकरणांमध्ये, YPrime ला विनंतीवर प्रक्रियेपूर्वी परिचयाचा पुरावा मागणे कायद्याने आवश्यक असते. तसेच, काही प्रकरणांमध्ये लागू होत असले, तर YPrime ला डेटा नियंत्रकाशी संपर्क साधावा लागेल. जर YPrime डेटा नियंत्रक वा उपनियंत्रक असेल तर.
YPrime त्यांना तशी विनंती पोहोचल्या दिवसापासून साधारणपणे एक महिन्याचे आत उत्तर देते. अशा काही प्रकरणांमध्ये ज्यात YPrime व्यक्तिच्या माहितीची मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली आहे तेव्हा ते विनंती मिळाल्यापासून तीन महिन्यांचे आत उत्तर देऊ शकतील. असा काही प्रकार असल्यास Yprime त्या व्यक्तिला मूळ विनंती मिळाल्यापासून एक महिन्यात उत्तर देईल.
जर एखाद्या प्रयुक्ताची प्रवेश विनंती उघड उघडपणे आधारहीन किंवा अत्यधिक असली, तर Yprime ती पूर्ण करायला बांधील नसते. पर्याय म्हणून, YPrime विनंतीची पूर्तता शुल्क आकारून करेल जे त्यांना त्यासाठी येणा-या प्रशासकीय खर्चावर अवलंबून असेल. उदा. जेव्हा एखाद्या प्रयुक्ताची प्रवेश विनंती उघडपणे आधारहीन किंवा अत्यधिक असेल जी YPrime ने उत्तर दिल्या नंतरही पुन्हा केलेली असेल. एखाद्या व्यक्तीने आधारहीन किंवा अत्यधिक विनंती केली, तर YPrime त्याला/ तिला अशी सूचना देईल की ही अशी बाब घडली आहे आणि त्याला उत्तर दिले जाईल किंवा नाही.
इतर अधिकार (Other Rights)
व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक माहिती संबंधात इतरही अनेक अधिकार असतात. व्यक्तींना YPrime ची ह्यासाठी आवश्यकता लागू शकतेः
- त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर आणि संकलन ह्या विषयी माहिती सांगणे;
- चुकीची वैयक्तिक माहिती दुरुस्त करणे;
- प्रक्रियेच्या उद्दिष्टांसाठी आता आवश्यक नसलेली वैयक्तिक माहिती काढून टाकणे किंवा प्रक्रिया थांबवणे;
- त्यांची वैयक्तिक माहिती साठवणे चालू ठेवणे पण त्याचा वापर न करणे;
- विशिष्ट परिस्थितीत जसे की थेट मार्केटिंग, एखाद्या व्यक्तिच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्याला हरकत घेण्याच्या त्याच्या अधिकाराचा मान राखणे;
- त्यांना त्यांची वैयक्तिक माहिती चल स्वरूपात पुरवणे म्हणजे ती दुस-या आयटी वातावरणात सहजी स्थलांतरीत करता येईल. आम्ही साधाऱणतः अशी विनंती “comma-separated-values” (csv) file स्वरूपात पुरी करतो;
- व्यक्तिच्या वैयक्तिक माहितीवर आधारीत संबंधात यांत्रिक (आपोआप) निर्णय घेण्याविषय़ी व्यक्तिच्या अधिकाराचा आदर करणे;
- जर YPrime च्या कायदेशीर आधारावर व्यक्तिची स्वारस्ये आक्रमण करीत असतील तर वैयक्तिक माहिती काढून टाकणे किंवा प्रक्रिया करणे थांबवणे. (ज्यात YPrime ही वैयक्तिक माहिती प्रक्रियेसाठी कायदेशीर स्वारस्यांवर अवलंबून असते.)
- जर प्रक्रिया कायदाबाह्य असेल तर वैयक्तिक माहितीची प्रक्रिया थांबवणे किंवा काढून टाकणे; आणि
- जर माहिती चुकीची असेल किंवा जर व्यक्तीची स्वारस्ये YPrime च्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेवर वैध आक्रमण करतात किंवा नाही असा वाद असेल, तर काही काळासाठी वैयक्तिक माहिती प्रक्रिया करणे थांबवणे
YPrime ला यातील कोणतीही पावले उचलण्यासंबंधी व्यक्तीने marketing@yprime.com वर एका ई मेलने संदेश द्यावा.
EU तील व्यक्ती ( EU तील माहिती प्रयुक्त) आपल्या देशांतल्या माहिती संरक्षण अधिका-यांकडे तक्रार करू शकतात आणि दुस-या कलहनिवारक यंत्रणांकडून सोडवून न मिळालेल्या उरलेल्या दाव्यांसाठी तक्रार दाखल करू शकतात व बंधनकारक लवादासाठी मागणी करू शकतात.
जर तुमचे एखादे मत वा चिंता थेट आमच्याकडून सोडवली गेली नाही, तर तुम्ही सक्षम स्थानिक माहिती संरक्षण अघिका-याकडे संपर्क साधू शकता.
माहिती संरक्षण (Data Security)
YPrime वैयक्तिक माहिती सुरक्षेला खूप गांभीर्याने पाहतात. YPrime कडे वैयक्तिक माहिती सुरक्षेसाठी नुकसान, अपघाती नष्ट होणे, गैरवापर किंवा उघड होणे, त्या पर्यंत आपल्या नेमस्त कर्तव्यपूर्ती करणा-या कर्मचा-यां शिवाय इतर कोणी पोहोचले नसल्याची खात्री करणे ह्या साठी स्वतःची अंतर्गत धोरणे आणि नियंत्रणे आहेत.
जेथे YPrime आपल्यावतीने वैयक्तिक माहिती प्रक्रिया करण्यासाठी तृतीयपक्षाची योजना करते, असे लोक लिखित सूचनांचे आधारे काम करतात, त्यांना गोपनीयतेची शपथ असते आणि माहिती सुरक्षेच्या खात्रीसाठी त्यांनी योग्य ते तांत्रिक व संघटनात्मक उपाय अंमलात आणायचे असतात.
YPrime जेव्हा वैयक्तिक माहिती तृतीयपक्षांना पाठवली जाऊ शकते अशा बाबतीतली संभाव्य जबाबदारी जाणते. YPrime कोणतीही वैयक्तिक माहिती तृतीयपक्षाकडे, तृतीयपक्ष गोपनीयतेची सर्व तत्त्वे पाळतो किंवा पुरेसे आणि समानदर्जाचे संरक्षण पाळतो ह्याची प्रथम खात्री करून घेतल्याशिवाय स्थलांतरीत करणार नाही. YPrime वैयक्तिक माहिती संबंध नसलेल्या तृतीय पक्षाकडे, ग्राहकाकडून कायद्याचा तसा आदेश असल्याशिवाय किंवा दुस-या डेटा नियंत्रकाने सांगितले असल्याशिवाय स्थलांतरीत करीत नाही. उदा. अशी परिस्थिती ज्यात ग्राहकाची वैयक्तिक माहिती उघड करणे कायद्याने किंवा कायदा प्रक्रियेने आवश्यक आहे; किंवा ओळखता येऊ शकणा-या व्यक्तीच्या महत्त्वाच्या स्वारस्यामध्ये गोष्टी उघड करणे ज्यात जीवन, आरोग्य किंवा सुरक्षा समाविष्ट आहे. YPrime ला जेव्हा वैयक्तिक माहिती संबंध नसलेल्या तृतीय पक्षाकडे स्थलांतरासाठी विनंती करण्यात येते तेव्हा YPrime ही खात्री करून घेते की तो तृतीयपक्ष पुरेसे आणि समान दर्जाचे संरक्षण पुरवेल. YPrime ला जर असे लक्षात आले की आपल्या कडून वैयक्तिक माहिती प्राप्त झालेला संबंध नसलेला हा तृतीयपक्ष माहिती वापरत किंवा सूचनांच्या विऱोधात उघड करीत आहे तर YPrime त्या संबंधात वापर होणे वा जाहीर होणे थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलेल.
प्रभावांचे/परीणामांची मूल्यमापने (Impact Assessments)
YPrime करते त्या प्रक्रियेतील काही भाग गोपनीयतेला जोखमीचा ठरू शकेल, जेव्हा प्रक्रियेच्या परिणामी व्यक्तिच्या अधिकार व स्वातंत्र्याला मोठीच जोखीम निर्माण होईल. YPrime प्रक्रियांचे प्रमाण व आवश्यकता निश्चित करण्यासाठी परिणामांचे मूल्यांकन करेल. ज्या साठी हा उपक्रम चालवला जातो आहे त्याच्या उद्दिष्टांचाही विचार त्यात समाविष्ट आहे, व्यक्तिंसाठीच्या जोखमी आणि त्या जोखमींचे निराकरण करण्यासाठीचे उपाय त्यात असतील.
माहिती फसवणूक (Data Breaches)
जर YPrime ला आढळले की वैयक्तिक माहिती बाबत फसवणूक होत आहे आणि त्या पासून व्यक्तींच्या अधिकार व स्वातंत्र्याला धोका आहे तर ती त्याचा अहवाल समजल्यापासून 72 तासांचे आत कमिशऩरला माहिती देईल. YPrime त्यांच्या परिणामांची पर्वा न करता सर्व माहिती फसवेगिरी नोंदवतील.
ती फसवणूक जर व्यक्तिंच्या अधिकार व स्वातंत्र्यावर मोठी जोखीम आणण्याची शक्यता असेल, तर ज्यांचेवर परिणाम होणार त्या व्यक्तींना संभाव्य परिणामांची जाणीव व ते टाळण्यासाठी केलेल्या उपायांसह सांगितले जाईल.
माहितीचे आंतरराष्ट्रीय स्थलांतर (International Data Transfers)
YPrime ने नियंत्रित किंवा प्रक्रिया करून ठेवलेला डेटा EEA (युरोपियन युनियन क्षेत्र) बाहेरच्या देशांकडे स्थलांतरीत केला जाऊ शकतो.
YPrime ह्या सूचनांनुसार लागू होणारी प्रमाण कंत्राटी कलमे वापरणे आणि वैयक्तिक माहिती वापरात या सूचनेचे उल्लंघन होते का, माहिती उघड होते का हे शोधून काढून काही तक्रारी वा वाद /मतभेद असले तर ते सोडवणे याचा पूर्ण प्रयत्न करायची खात्री देतात.
YPrime च्या कर्मचा-यांच्या जबाबदा-या (YPrime Employee Responsibilities)
YPrime च्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात कदाचित् त्यांचे ग्राहक, क्लायंट्स आणि इतर व्यक्तींच्या वैयक्तिक माहितीपर्यंत प्रवेश असू शकेल. अशा प्रसंगात YPrime ला आपल्या माहिती संरक्षण बंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आणि ग्राहक,क्लायंट्स ह्यांचे मदतीवर अवलंबून रहावे लागते.
ज्या कर्मचा-यांना वैयक्तिक माहिती पर्यंत प्रवेश असतो त्यांना आवश्यक असतेः
- ज्या उद्दिष्टासाठी व जेथपर्यंत परवानगी मिळाली असेल फक्त तेवढ्याच वैयक्तिक माहिती पर्यंत प्रवेश;
- YPrime च्या आतले असतो वा बाहेरचे, ज्यांना योग्य अधिकार प्राप्त आहे अशां शिवाय इतरांना माहिती उघड न करणे;
- उदा. त्या स्थानांचा प्रवेश, सर्व नियम पाळून पासवर्ड संरक्षणासह संगणकाचा प्रवेश आणि फाईल साठवण सुरक्षित राखून नाश टाळण्यासह माहिती सुरक्षित ठेवणे;
- YPrime च्या स्थानावरून माहिती आणि ते उपकरण संरक्षित ठेवायला योग्य ती संरक्षण साधने जसे की इऩ्क्रिप्शन किंवा पासवर्ड संरक्षण न वापरता वैयक्तिक माहिती, किंवा ती असलेले किंवा वैयक्तिक माहिती प्रवेशासाठी वापरता येणारे उपकरण न काढणे;
- वैयक्तिक माहिती लोकल ड्राईव्हज् वर किंवा अनेक उद्धिष्टांच्या कामासाठी वापरायच्या व्यक्तिगत संगणकावर न साठवणे;, आणि
- माहिती विषयक फसवणूक जाणवल्यास त्यांनी ती कळल्या बरोबर त्वरित privacy@yprime.com वर ई-मेल ने कळवणे.
ह्या आवश्यकता पाळण्यात अपय़श आल्यास तो शिस्तभंगाचा अपराध समजला जाईल आणि त्याची दखल YPrime च्या शिस्त आणि कार्यपद्धतीं धोरणांखाली घेतली जाईल.
YPrime त्यांच्या माहिती संरक्षण धोरणाविषयी जबाबदा-यांचे प्रशिक्षण आपल्या सर्व कर्मचा-यांना कार्यपरिचय म्हणून आणि त्या नंतर नियमित काळाने पुरवत राहील.
ज्या कर्मचाःयांच्या कामात नियमित वैयक्तिक माहिती प्रवेशाशी संबंध येतो, किंवा जे ह्या सूचनेचा अवलंब करायला जबाबदार आहेत किंवा जे ह्या सूचनेनुसार प्रयुक्त माहिती प्रवेश विनंतीला उत्तर देणारे आहेत त्यांना, त्यांची संबंधित कर्तव्ये जास्त नीट समजून त्यांची पूर्तता करायला मदत व्हावी म्हणून जास्त प्रशिक्षण दिले जाईल.
इंटरनेट गोपनीयता (Internet Privacy)
YPrime, किंवा त्यांच्या मार्गदर्शनावरून तृतीयपक्ष वेबसाईट द्वारे आणि वेबसाईटच्या इतर घटकांना भेट देणा-याकडून वैयक्तिक माहिती गोळा करण्याची शक्यता असते तेसुद्धा ह्या सूचनेच्या अधीन असतील. अशी वैयक्तिक माहिती जेव्हा एखादी व्यक्ती तिचे/ त्याचे नाव आणि/ किंवा पत्ता सादर करेल तेव्हा गोळा करता येऊ शकते.YPrime किंवा YPrime च्या निर्देशाखाली तृतीयपक्षही विविध यंत्रांवरून येणा-या माहितीवरून, व्यक्ती कोणतीही माहिती सक्रियपणे सादर न करताही विविध डिजिटल मार्गांनी वेबसाईट वरील भेटींमार्फत माहिती मिळवू शकतात जसे की आयपी ऍड्रेसेस, कुकीज आयडेंटिफायर, पिक्सेल्स आणि अंतिम वापरकर्त्याची साईटवरची हालचाल. जरी अशी विविध यांत्रिक मार्गांनी आपोआप डिजिटल मार्गांनी प्रकट झालेली माहिती गोळा झाली तरी अधिक माहिती शिवाय विशिष्ट व्यक्तिंची थेट ओळख पटवून देऊ शकत नाही, इंटरनेट वेब ब्राउझर्स आपोआप Yprime वेबसाईटला कळवतात की एका वापरकर्त्याच्या संगणकावर ह्या सॉफ्ट वेअऱचा वापर सुरू आहे जसे की आय़पी ऍड्रेस आणि ब्राऊझरचे व्हर्जन. अधिक ओळखण्यायोग्य वैयक्तिक माहिती मिळाल्याशिवाय निव्वळ ह्या तंत्रज्ञानाचे मदतीने मिळालेल्या माहितीवरून कोणीही व्यक्ती ओळखली जाऊ शकत नाही.
कुकीज (Cookies)
YPrime कुकीज म्हणजे माहितीच्या लहान फाईल्स वापरते ज्या आमच्या प्लॅटफॉर्मकडून दिल्या जातात आणि तुमच्या उपकरणात साठवल्या जातात. आमची वेबसाईट आम्ही किंवा तृतीयपक्षाने विविध उद्देशांनी संचलन व वैयक्तिकरण ह्यासह उद्देशांनी सोडलेल्या कुकीज या वापरकर्त्यांचा अऩुभव सुधारणे आणि लक्ष्यित जाहिरातींचे उद्देशाने वापरते. तुमचे ब्राझिंगचे सत्र संपतांना कुकीज नष्टही होऊ शकतील. किंवा त्या तुमच्या संगणकावर साठवून ठेवल्या जाऊन तुमच्या पुढच्या त्या वेबसाईटच्या पुढच्या भेटीचे वेळेसाठी तयारही असतील. तुम्ही तुमच्या ब्राऊझरवर सेटिंगचे समायोजन करून कुकीजच्या सेटिंगना प्रतिबंध करू शकता (हे कसे करावे पाहण्यासाठी तुमच्या ब्राऊजरचा \”हेल्प\” विभाग पहा.) कुकीज अक्षम केल्यावर आमच्या वेबसाईटविषयीच्या तुमच्या अऩुभवावर परिणाम होईल.
आवृत्ती 9, शेवटचे 25 मार्च 2023 रोजी अपडेट केले